मी विकास नागोसे (सहा. शिक्षक) MY SCHOOL ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत करतो, 7385 124360

जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा जि. प. प्राथ. शाळा, खनोरा

Monday 25 May 2020

Income Tax बाबत जाणून घेऊया 2

Income Tax बाबत जाणून घेऊया
आर्थिक लेखमाला:
लेख क्र.2

✍©लेखन- प्रसाद साळवे(9226587571)


♦ ITR Print
ITR म्हणजेच
Income Tax Return कार्यालयाकडून फॉम नंबर सोळा मिळाल्यानंतर रिटर्न दाखल करणे ही संबंधित व्यक्तीची जबाबदारी असते. परंतु आपण सामान्यतः ज्यांना टॅक्स चे काम दिले आहे. हे त्यांच्याकडूनच हे रिटर्न फाईल करून घेत असतो. व हे योग्यही आहे.  परंतु हे काम अर्थात आपले रिटर्न फाईल झाले का व योग्य प्रकारे आणि वेळेपूर्वीच झाले का?  यावर आपले लक्ष असावे लागते.

♦ रिटर्न फाईल करणे म्हणजे काय?
हे आपल्याला एका सोप्या उदाहरणाने समजून घेता येईल. समजा तुमची एका किराणा दुकानात  उधारी आहे. तुम्ही गरजेनुसार वारंवार किराना घेता व जास्त पैसे होऊ नये म्हणून वर्षात अनेक वेळा दुकानदाराला पैसे देता.  पण तुम्ही हिशोबच केला नाही तर किराना जास्त झाला की पैसे जास्त दिले हे कळणार नाही. त्यासाठी आर्थिक वर्ष संपल्यावर किराणा दुकाणदार व तुम्ही हिशोब केल्यावर (अर्थात रिटर्न दाखल केल्यावर) कळेल. असा हिशोब झाला तर तुमचा वर्षभर कापलेला टॅक्स जास्त असेल तर रिफंड मिळेल. कमी कापला असेल तर तुम्हाला अजून टॅक्स पे करावा लागेल.
हा हिशोब Income Tax Department  कार्यालयाला आपण वेतन अथवा उत्पन्न घेतो त्या बदल्यात देणे आवश्यक असते यालाच Income Tax Return म्हणतात.
रिटर्न हा Online किंवा  विशिष्ट Format मधील फाईल डाऊनलोड करून पुन्हा अपलोड करून दाखल करता येतो.

♦ TDS म्हणजे काय ?
याचा लॉंग फॉम Tax Deducted at Source असा आहे.  यातील Source सोर्स हा शब्द महत्त्वाचा आहे. याठिकाणी आपला उत्पन्न सोर्स पगार असतो. अर्थात पगार देता वेळीच (At Source) तुमचा टॅक्स कापला जाणे यालाच TDS म्हणतात. जे पगार अर्थात उत्पन्न देते त्यावर काही दराने दरमहा कर कपातीचा अधिकार हा त्या त्या कार्यालयाला असतो.

TDS हा कोणत्याही परिस्थितीत तुमच्या त्या महिन्यातील वेतनापेक्षा जास्त संबंधित कार्यालयाला कपात करता येत नसतो. म्हणून तो वर्ष भर थोडाथोडा किंवा आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी काही महिने थोडा थोडा कपात केला जातो. त्या आधारे 16 नंबर तयार करून तुम्हाला दिले जाते व त्यावरूनच ITR फाईल केला जातो. रिटर्न फाईल केल्यावर त्याची माहिती तुम्हाला ईमेलवर आयकर विभागाकडून दिली जाते. त्याची इमेलवरून प्रिंट काढून तुमच्या फाईला ठेवणे आवश्यक असते. शक्य न झाल्यास किमान ITR Acknowledgement ची प्रत तुमच्याकडे असावी. ती देखील तुम्हाला ईमेलवर मिळत असते.

♦ फॉम 26AS म्हणजे काय? 
 आयकर कायदा सन 1961 मध्ये  Section 203AA  मध्ये उल्लेखानुसार प्रत्येक व्यक्तिला एक एप्रिल रोजी त्याने जमा केलेला Tax अथवा TDS याचे वार्षिक स्टेटमेंट(AS- Annual Statement) दिले जावे.
थोडक्यात फॉम 26AS मध्ये तुमचा वर्षभर कपात केलेला TDS चा हिशोब असतो.
हा फॉम income Tax वेबसाईट अंतर्गत TDS वेबसाईटवर प्रत्येकाला  आयकर विभागाने उपलब्ध करून दिलेला असतो.
26AS हा Income Tax फाईल करतेवेळी एकदा  बघणे आवश्यक असतो कारण बऱ्याच वेळा तुम्ही केलेल्या FD किंवा खाजगी गुंतवणूक मुळे मिळणारे उत्पन्न किंवा व्याज देणारी संस्था तुमचा 5%,10%,तुमचा TDS कपात करत असते. सदर जमा झालेला TDS तुम्हाला त्याचे उत्पन्न व TDS लक्षात घेऊन ITR भरणे आवश्यक असते. यामुळे तुमच्या Tax चे गणित अधिक उने होऊ शकते म्हणून फॉम 26AS जरूर बघावा. हा TDS संबंधित आयकर विभागाद्वारे जारी केलेला महत्वाचा दस्तऐवज असतो.
बजेट 2020-21 मध्ये कलम 285BB हे 26AS साठी नवीन कलम अंतर्भूत केलेले आहे. यावर्षीपासून फॉम 26AS जास्त डिटेल्स दाखवण्याची शक्यता आहे. यात तुमचे विविध खात्यावरील बँक व्यवहार दाखवण्याची शक्यता आहे. नवीन प्रकारचा  Form 26AS हा 01 जून 2020 पासून कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.( कदाचित् कोरोनामुळे उशीरही होऊ शकतो, जरा रिटर्न भरणे  सुरू झाले नाही तसे) त्याचे नवीन नाव
Comprehensive Annual Information Statement असे असणार आहे.(संदर्भ- टाईम्स नाऊ न्यूज दिनांक 04-02-2020)

तुमच्या उत्पन्नाचा अंदाज घेऊन ढोबळमानाने ठराविक रक्कम TDS म्हणून  तुमच्या  पगारातून कापली जाते.  ती कमी का जास्त कापली याचा हिशोब रिटर्न(ITR) दाखल करते वेळी होणार असतो. जर जास्त कपात झाला असेल तर रिटर्न दाखल केल्याशिवाय तुमच्या बँक खात्यात त्याचा रिफंड तुम्हाला मिळणार नाही. रिफंडसाठी टॅक्स कन्सलटंट यांना रिटर्न दाखल करण्यापूर्वीच तुमचा बँक खाते क्रमांक देणे आवश्यक असते. तुमचा बँक खाते क्रमांक दिला गेला नाही तर तुमचा जास्त कपात झालेला टॅक्स रिफंड तुम्हांला मिळणार नाही.  रिटर्न दाखल करतेवेळी तुमच्या सर्व खाते क्रमांकाची अद्यावत आयएफएससी कोडसह देणे व भरणे आवश्यक असते. तसेच त्या खात्याचे validation किंवा  पडताळून पाहणे देखील आवश्यक असते. तुमच्या बँक खात्यालाही मोबाईल नंबर लिंक असल्यावर कशी मदत होते व validation बद्दल अधिक माहिती याचा परामर्श आपण पुढील लेखात विस्ताराने घेणार आहोतच.
 तुमचे रिटर्न दाखल करण्याला देखील दरवर्षी काल मर्यादा असते. एप्रिल ते जून जुलै दरम्यान किंवा आयकर विभागाने जाहिर केलेल्या अंतिम दिनांकाच्या आत रिटर्न दाखल करणे आवश्यक असते. ती मुदत संपल्यावर तुम्हाला लेट फी किंवा नोटीस येऊ शकते.
 रिटर्न दाखल करतांनाच तुमचा वेबसाईटवर नोंदवलेला पत्ता, ईमेल, फोन नंबर, आधारला PAN लिंक आहे का या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक असते.
वेबसाईटवर पत्ता तुमचा नसेल किंवा चूकीचा अथवा जूना असेल तर आयकर विभागाला तुमच्याशी संपर्क करणे कठिण जाते.  नोटीस किंवा काही माहिती आयकर विभागाकडून आली तर चूकीच्या पत्त्यामुळे ती नोटीस तुमच्या पर्यंत पोहचू शकत नाही. म्हणून आयकर सल्लागारांसोबत या विषयी चर्चा करून तुमचाच कोणताही एक पत्रव्यवहाराचा कायम पत्ता तुमचाच ईमेल तुमचाच मोबाईल नंबर तेथे नोंदवलेले आहे का याची तपासणी करायला सांगायला हवे.  या छोट्या पण आवश्यक अशा बाबी आहेत. तुमच्या अनास्थेमुळे किंवा सहकार्या अभावामुळे या गोष्टी वर्षानुवर्षे तेथे जून्याच व अपडेट केलेल्या नसतात.
आयकर व त्यासंबंधी किमान माहिती व आपले कर्तव्य याची जाणीव प्रत्येक आयकर भरणाऱ्या व्यक्तीला असायला हवी.  आपले काम फक्त सोळा नंबर जमा करून बिनधास्त होण्यापूरते मर्यादित नसून आपल्या चौकसवृत्ती अभावाचा फटका आपल्याला कधी ना कधी बसू शकतो म्हणून जागरूक राहणे आवश्यक असते.

तुम्हांला पोस्टाने नोटीस मिळाली नसेल तर तुम्हाला बसलेला अतिरिक्त Tax याची नोटीस वेबसाईटवर असते. तशी नोटीस व अतिरिक्त Tax मागणी तुमच्याकडे पेंडिग आहे काय ? याची चौकशी कर सल्लागार व्यक्ती अथवा संस्थेशी तुम्ही करणे आवश्यक असते.  सदर नोटीस का आली याची कारणमिंमासा देखील जाणून घेऊन छोटी रक्कम असेल तर भरून रिकामे होणे अथवा शक्य नसेल तर आयकर विभागाला त्या बाबत स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. या नोटीस बाबतीत पुढील लेख क्रमांक 4 मध्ये विस्ताराने माहिती येईलच.
*******
आयकर सेवा सल्ला अथवा मदतीसाठी संपर्क करा.  9226587571 Prasad Salve

Email- prasadnsalve@gmail.com
 https://www.facebook.com/prasadnsalve

Twitter https://twitter.com/prasadnsalve?s=09
*******
पुढील लेख क्रमांक 3 मध्ये आपण ITR Acknowledgement व त्याचे व्हेरिफिकेशन कसे करावे याबाबत माहिती घेणार आहोत

Income Tax बाबत जाणून घेऊया भाग 1

Income Tax बाबत जाणून घेऊया भाग 1

©लेखन -प्रसाद साळवे(9226587571)

Income Tax फाईल

वर्षातून एकदा फॉम नंबर सोळा मिळाला की तो घरात कोणत्या तरी फाईल मध्ये टाकला जातो. जेव्हा एखादे लोन घेण्यासाठी 16 नंबर मागीतले जाते.तेव्हा मात्र घरात मागील तीन वर्षाचे 16 नंबर शोधतांना दमछाक होते.
मग केंद्रप्रमुख, केंद्रिय मुख्याध्यापक किंवा जे Tax चे काम बघतात त्यांना फोन जातो व पून्हा त्याची एक प्रत मागीतली जाते. त्यावर पुन्हा सही शिक्का घ्या.. या बाबी आल्याच.

काही या आर्थिक बाबींचे योग्य वर्षानूरूप फायलींग करून ठेवत असतील ते कौतुकास्पदच...

आर्थिक बाबींचे योग्य जतन न केल्यामुळे अथवा आपण गाफिल राहिल्यामुळे या निष्काळजी पणाचा आपल्या एकदा तरी खूप त्रास होऊ शकतो किंवा झाला असेल.
यावर उपाय म्हणजे बाजारातून एक चांगली छोटी बॉक्स फाईल व पेपर पंच  घेऊन त्यात आठवणीने आर्थिक रेकॉर्ड जपून ठेवणे.
यात आपण ठेऊ शकतो
1. आर्थिक वर्षाचे पगार पत्रक प्रिंट
2. Tax calculation Sheet
3. Form 16(Online & offline)
4. ITR Print
5. Acknowledgement Receipt
6. Intimation 143(1)
7. Tax बचतसाठी दिलेल्या पावत्या झेरॉक्स

असे  सात ते आठ प्रकारचे पेपर्स आपल्याकडे असतील तर आपले त्या वर्षाचे आर्थिक रेकॉर्ड पूर्ण होते.
पण यातील आपल्याला फक्त 16 नंबर माहित असते.
तसे कार्यालया मार्फत आपल्याला फक्त फॉम नंबर सोळा देणे बंधनकारक असते तीच एक हार्ड कॉपी मागण्याचा आपला अधिकार असतो.. उर्वरीत डॉक्युमेंटस म्हणजे वरील अनुक्रम 4,5,6 हे आपल्याला ईमेलवर आपोआपच मिळत असतात.  त्याच्या  प्रिंट आपण स्वतः काढून जतन करून ठेवल्या पाहिजेत.
Income Tax Return Copy, acknowledgement व Intimation 143 हे तीन डॉक्युमेंटस आपल्याला मिळण्यासाठी इनकम टॕक्स वेबसाईटवर आपलाच Email Address नोंदवलेला असणे महत्त्वाचे असते. त्याच बरोबर Income Tax संबंधित मेसेजस येण्यासाठी वेबसाईटवर आपल्या स्वतःचा फोन नंबर तेथे इमेल सोबतच नोंदवलेला असावा लागतो.

 यावर आपण क्रमशः चर्चा करूयात
 1.पगार पत्रक
 वर्षभराचे पगारपत्रक softcopy किंवा Hardcopy या आपल्याकडे असाव्यात नव्हे ते आवश्यक आहेच.. खूप जनांना पगार कसा झाला म्हणजे महागाई किती, घरभाडे किती, बेसीक किती; याची आकडेमोड माहित नसते.
 जानेवारी फेब्रुवारी मध्ये Tax calculation शिट मध्ये दिलेले Gross पगार बरोबर आहे का हे तपासून बघीतले पाहिजे. हे तेव्हाच तपासता येईल जेव्हा आपल्याकडे वर्षभराचे पगारपत्रक असेल. बँकेत जमा झालेल्या पगाराचे विश्लेषण केले तरी ते सहज लक्षात येऊ शकते.
 Tax calculation शीट मध्ये दाखवलेली गुंतवणूक बरोबर आहे का हेही काळजीपूर्वक बघीतली पाहिजे कारण त्यामुळे तुम्हांला कमी जास्त Tax लागू शकतो. बाकीचे calculation हे Tax शिट बनवणारे हे बरोबर करतात व ते तुम्ही मान्य केलेल्या आकड्यांवर अवलंबून असते.

 2.Tax Calculation Sheet
  याची हार्डकॉपी आपल्याकडे असावी. कारण यात Gross पेमेंट सोबतच कोणकोणत्या बचतीमुळे आपल्याला किती Tax बसला आहे हे कळते. हे तेच प्रपत्र आहे. जे आपण सही शिक्का करून त्याला पावत्या जोडून अॉफीसला परत देत असतो.

3. फॉम नंबर 16.
हा टँक्स बाबत महात्वाचा दस्तऐवज आहे. याचे दोन प्रकार असतात. एक Online Form 16 आणि दुसरे Offline  Form 16.
A) Online Form 16. जेव्हा कार्यालय तुमचा कपात केलेला TDS चे रिटर्न फाईल केले जाते त्यानंतर  TDS वेबसाईटवरून हे जनरेट केले जाते. हा तितकासा महत्त्वाचा दस्तऐवज नाही कारण यात Gross वेतन व बचती बाबत जास्त तपशीलवार आकडेवारी नसते. व तपशीलवार नसल्यामुळे पुढे जेव्हा आपल्या Income Tax चे रिटर्न फाईल केले जाते. तेव्हा याची जास्त मदत होत नाही.  म्हणूनच कदाचित् कार्यालय आपल्याला हि online कॉपी प्रिंट देत नाही. व आपणाला ही हा तितकासा महत्त्वाचा नाही. म्हणून softcopy मध्ये असेल तर ठिक नसेल तर काहीच हरकत नाही. गेल्यावर्षी पासून यात थोडी डिटेल्स देण्याचा आयकर विभागाकडून प्रयत्न सुरू आहे. पण अनेक सेक्शन्स जसे की 80U व 80DD याची माहिती नसते. यात 80C ची Gross बचत तपशीलवार नसते.
B) Form 16 (offline Copy) ही हार्डकॉपी कॉपी आपल्याला  कार्यालय देत असतेच. हा Tax चे काम करणारे यांच्याकडून Software वापरून तयार केलेला फॉम असतो. यावर सर्व बाबी डिटेल्समध्ये असतात. याची एक प्रिंट आपल्या आयकर फाईलला असावीच. हा फॉम आपल्याला होम लोन, उत्पन्नाचे प्रमाणपत्र व बँकेत अनेक वेळा मागीतला जातो. रिटर्न फाईल करण्यासाठी याची गरज असते यावर अॉफीस प्रमुखाचा शिक्का व सही असते.  हा साधारणतः 1 एप्रिल ते  1 मे च्या दरम्यान  प्रत्येक कर्मचाऱ्यांना मिळायाला हवा. व हा एकच वरील सात आठ पैकी  अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज असल्यामुळे तो आपल्याकडे अतिशय व्यवस्थित फाईल करून ठेवावा.

क्रमशः

(लेखावर प्रतिक्रिया वा शंका वैयक्तिक whatsapp विचारू शकता. तुमच्या शंका व चर्चेच्या बाबी पुढील लेखात समाविष्ट करता येतील.)





Thursday 12 April 2018

मा. जोतिबा फुले

जोतीराव गोविंदराव फुले

                महात्मा जोतिबा फुले (एप्रिल ११इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.


बालपण आणि शिक्षण

जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला.. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.
प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

सामाजिक कार्य[संपादन]

सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तथाकथित उच्चवर्णीयांकडून होणार्‍या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुल्यांच्या कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -
विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.


साहित्य आणि लेखन

वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईट्‌स ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्‌र्‍य आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्‍नी सावित्रीबाईंना १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्‍याचा असूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्‌र्‍याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.
'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

Monday 26 December 2016

गणित विभाग विद्याप्राधिकरण

             
                           राज्यातील १ ली ते ५ वी ला अध्यापन करणाऱ्या शासकीय    ( जि.प./स्थानिक स्वराज्य संस्था) व खाजगी अनुदानित शाळामधील २५ % शिक्षकांना गणित विषयात प्रगल्भ करणेबाबत प्रशिक्षणासाठीची गुगल फॉर्म लिंक आहे . या लिंकच्या मदतीने आपल्या जिल्ह्यातील  जास्तीत जास्त संबंधित शिक्षकांकडून मागणी पत्र भरून द्यावे. ही लिंक विदया प्राधिकरणाच्या वेबसाईटवर दि. १९/१०/२०१६पासून उपलब्ध आहे. या लिंकचे नाव गणित प्रगल्भीकरण प्रशिक्षण मागणी प्रपत्र असून विदया प्राधिकरणच्या वेबसाईटवर यापूर्वी गणित व भाषा प्रशिक्षणापेक्षाही लिंक भिन्न असून  या लिंकवरील मागणी पत्रात माहीती भरलेल्या शिक्षकांनाच २५ % प्रशिक्षणासाठी गृहीत धरण्यात येईल. ही बाब संबंधित शिक्षकांच्या निदर्शनात आणून द्यावी. गुगल फॉर्मवर माहिती भरण्याची अंतिम मुदत ३१/१२/२०१६ ही आहे. 

गणित प्रगल्भीकरण प्रशिक्षण मागणी करिता खाली बटन वर click करा



Spoken English प्रशिक्षनाची online नोंदणी सुरु झाली आहे, तरी नाव नोंदणी करावी.
स्पोकन इंग्लिश. पुढील बॅचसाठी खालील लिंकबटन वर क्लिक करा व माहिती भरा.



Wednesday 20 January 2016

मुखपृष्ठ


आपले हार्दिक स्वागत आहे.


        आपले हार्दिक स्वागत



 

शाळेतील झाडाला आलेले पहिले फणस 


आपले हार्दिक स्वागत